
वेंगुर्ला : वेंगुर्ले शहरातील किरण शरद मेस्त्री हिने 'चार्मिंग मिस इंडिया' हा अत्यंत मानाचा किताब पटकावून आपल्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल, वेंगुर्ला भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचा विशेष सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.
किरणच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. वेंगुर्ल्याच्या भूमीतील हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. भाजपा महिला मोर्चाने किरणच्या पाठीशी उभे राहून तिला दिलेला हा पाठिंबा, इतर युवतींनाही प्रेरणा देईल असे मत यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, दादा केळुसकर, तालुका सरचिटणीस आकांशा परब, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, तसेच माजी नगराध्यक्ष पूजा कर्पे, हसीना मकानदार, रसिका मठकर, मानसी परब, वृंदा मोर्डेकर, शरद मेस्त्री, कौस्तुभ वायंगणकर, सायमन अल्मेडा, वैभव होडावडेकर, राजन परब, प्रसाद वेंगुर्लेकर, दिलीप परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.