किरण लोहार रत्नागिरी जि. प.चे शिक्षणाधिकारी !

Edited by: मनोज पवार
Published on: October 29, 2025 15:17 PM
views 28  views

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी किरण लोहार यांची नियुक्ती झाली आहे.

 शिक्षण क्षेत्रातील पूर्ण माहिती आणि उत्तम प्रशासक म्हणून किरण लोहार यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या अनेक प्रश्नाविषयी त्यांनी उत्तम सहकार्य केल्याने, अनेक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.सध्या ते रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागात योजना शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.

सन २०१६ साली कोकण विभागीय माध्यमिक,उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सह सचिव असताना,रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी होते.या काळात किरण लोहार यांनी स्वतः लक्ष घातल्याने विनाअनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाल्या.व या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र झाली ती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यामुळेच! संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये,व शिक्षक या उल्लेखनीय कामाचा आजही उल्लेख करतात.

किरण लोहार यांनी कोकण बोर्डाचे सह सचिव तसेच डिव्हिजनल सेक्रेटरी,कोकण विभागीय परीक्षा मंडळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कोहापूर जिल्हा परिषद,सह सचिव कोल्हापूर बोर्डात काम केले आहे.शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, प्राथमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद,प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हापरिषद,रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व योजना शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.आता पुन्हा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक पदी नियुक्ति झाली आहे.

     

प्रत्येक पदावर काम करताना किरण लोहार यांनी प्रत्येकाला न्याय देत,आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.एमपीएस्सी परीक्षा क्रॅक करून अधिकारी म्हणून शिक्षण विभागात सेवेत आलेल्या किरण लोहार यांना शिक्षण विभागाची नसान नस माहित आहे.ज्या विभागात काम करत आहोत त्या विभागाची व शासन निर्णयांची खडान खडा माहिति असणारा अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे. शिस्त प्रिय पण तितकाच प्रेमळ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाल्याने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनांकडून स्वागत होत आहे. व शुभेच्छा दिल्या जात आहेत