देवगडच्या किरण खरातची अग्नीवीर म्हणून आर्मीत निवड..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 26, 2024 13:52 PM
views 41  views

देवगड : देवगड तालुक्यातील  कुवळे - रेंबवली (धनगरवाडी) येथील किरण संतोष खरात यांची अग्नीवीर म्हणून इंडियन आर्मीत (भारतीय सैन्यात) निवड झाली आहे. किरण खरात यांचे प्राथमिक शिक्षण साळशी येथे झाले व माध्यमिक शिक्षण कुवळे येथे घेतले .व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच सन २०२० मध्ये ओरस येथील सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग येथे आर्मी भरतीपुर्व  ६ महिन्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केल्याप्रमाणे घरी येऊन भरपूर सराव केला.

त्याने एप्रिल  २०२३ मध्ये कोल्हापूर येथे   इंडियन आर्मीपदासाठी आवश्यक असलेली  लेखी परिक्षा, व डिसेंबर मध्ये मैदानी परिक्षा दिली.त्या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला असून त्याची निवड भारतीय आर्मीत अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे. यासाठी त्याला आपले काका यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच यासाठी आई- वडीलांनी प्रोत्साहन दिले.किरण खरात यांचे आई- वडील शेतकरी असले तरी किरणच्या भारतीय सैन्यातील निवडीबद्दल त्यांना आनंद झाला आहे.

किरण खरात याचे लहानपणीच आर्मीत जाऊन देशसेवा करण्याचे  स्वप्न आज २१ व्या वर्षी पूर्ण झाले आहे. या तरुणाच्या जिद्द आणि चिकाटीमुळे मिळालेले यश इतर तरुणांना प्रेरणा देणारे आहे. या त्याच्या निवडीबद्दल साळशी व कुवळे-रेंबवली ग्रामवासीयांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.