किरण उर्फ भैय्या सामंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 02, 2024 06:18 AM
views 113  views

सिंधुदुर्ग : किरण उर्फ भैय्या सामंत आज रत्नागिरीवरून सिंधुदुर्गात येत असून सिंधुदुर्गातील कणकवली व मालवण तालुक्यात त्यांचा दौरा असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मानले जाणारे किरण उर्फ भैय्या सामंत हे आज सिंधुदुर्गात येत असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी कणकवली शिवसेना कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत.  नंतर ते भराडी देवीच्या दर्शनासाठी निघणार आहेत. तेथे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा होणार असल्याचे समजत आहे. कार्यकर्त्यांनी लोकसभेची उमेदवारी सामंत यांना मिळावी अशी आग्रही मागणी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे. आणि त्यानंतर आता सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा असल्याने या दौऱ्यात नेमके काय घडते याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. सामंत यांच्या दौऱ्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.