किंजवडे ग्रा. पं. तील नूतन स्वच्छतागृहाचे उद्घाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 21, 2023 10:20 AM
views 166  views

देवगड : किंजवडे ग्रामपंचायतच्या नूतन स्वच्छतागृहाचे उद्घाटन  भूविकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा प्रबंधक अॅडवोकेट सत्यवान बुधाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छतागृहाच्या उद्घाटन प्रसंगी किंजवडे ग्रामपंचायतचे सरपंच संतोष किंजवडेकर, ग्रामसेवक शिवराज राठोड, किरण टेंबुलकर, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या वेळी अनेक उपक्रम किंजवडे ग्रामपंचायत यावर्षी राबविले आहे.

याच कार्यक्रमाचे उद्घाटन माजी भूविकास बँकेचे मॅनेजर व नुकतीच वकिली पदवी प्राप्त केलेले सत्यवान बुधाजी कदम यांचा सत्कार ही ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. किंजवडे ग्रामपंचायत तिने नुकतेच विवाह दाखला गावातील जनतेला मिळण्यासाठी वृक्ष लागवड सक्तीची केली आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये आदर्श व ठरत आहे. तसेच देवगड तालुक्या मधील सर्वाधिक मोठा ध्वज किजवडे ग्रामपंचायत मध्ये यावर्षी 15 ऑगस्ट रोजी फडकविण्यात आला. असे नवनवीन उपक्रम राबवून किजवडे ग्रामपंचायत आदर्श स्मार्ट ग्राम पंचायतीकडे वाटचाल करताना दिसत आहे.