सिंधुदुर्गच्या राजाचे नितेश राणेंनी घेतलं दर्शन

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 27, 2023 19:17 PM
views 171  views

कुडाळ : कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे दर्शन भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी घेतले. यावेळी त्यांना सिंधुदुर्ग राजाचा प्रसाद भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी दिला. कुडाळ भाजप कार्यालय येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे.

यावेळी प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, पप्प्या तवटे, नगरसेवक ॲड राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, रेवती राणे, राकेश नेमळेकर, चंदन कांबळी आदी उपस्थित होते. तसेच आमदार नितेश राणे यांनी यावेळी सेवा सप्ताह निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप केले.