खिचडी चोरांना त्याच महत्व कळणार नाही : नितेश राणे

Edited by:
Published on: November 10, 2024 15:40 PM
views 148  views

कणकवली : आमच्या योजना चे नाव बदलून काँग्रेसला जाहीरनामा छापायचा होता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विरुद्ध कोर्टात याचिका का दाखल केली ? याचे उत्तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी द्यावे आणि मगच लाडकी बहीण योजनेवर बोलावे. लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये प्रत्येक महिलेसाठी किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोरांना समजणार नाही.

किंवा लोकसभेत खटाखट पैसे देणार म्हणणाऱ्या आणि तेवढ्याच पटापट इटलीला पळून गेलेल्या राहुल गांधी यांना ही या योजनेची किंमत कळणार नाही. ज्या उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जाहीरपणे लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणून घोषणा केली त्यांनाही आधी राज्यातील माता भगिनींची माफी मागावी आणि मगच या विषयी बोलावे  अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या एका समर्थकाने कोर्टात याचिका टाकली आहे. ती मागे घ्या मागत तोंड उघडा.तुमचा खोटारडे पणा जनतेला समजला आहे. तुम्ही डबल ढोलकी आहात हे जनतेला माहित झाले आहे.संजय राऊत ने महिलांच्या सन्मनाबाबत बोलायचा  अधिकार नाही.तुझ्या सारखा चित्रपटातील राजाबाबू ने मिहिलांबाबत बोलू नये.खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणार नाही.दीड हजार मुळे किती लोकांची दिवाळी गोड झाली ते विचारा अस मलाडकी बहीण योजनेचे महत्व कळेल असे आमदार नितेश राणे म्हणाले.