
चिपळूण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ आणि श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिर परिसरात खिचडी वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी व भक्तगणांनी सहभाग घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिपळूण तालुका व शहर विभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, महिला शहर संघटिका सौ. वैशाली शिंदे, शहर सचिव प्रशांत मुळे, उप शहरप्रमुख संजय रेडीज, सचिन उर्फ भैया कदम, राजू विखारे, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे, पेढे जि.प.गट विभाग प्रमुख सचिन शेट्ये, महिला शहर उपसंघटिका सौ. अर्चना कारेकर, विभागप्रमुख समीर राऊत, उपविभाग प्रमुख अमोल पिसे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक बळकट होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.