SSC RESULT 2023 | खेमराज मेमोरियल बांदा शाळेचा 100 टक्के निकाल

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 17:07 PM
views 73  views

बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून परीक्षेसाठी एकूण ८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्राविण्य विद्यार्थी ५०, प्रथम श्रेणी १७, व्दीतीय श्रेणी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.प्रशालेतून प्रथम निशांत महेश नाईक (९६.८०टक्के), द्वितीय कौस्तुभ राजेश सावंत (९४.६०), तृतीय ईशिता जितेंद्र सावळ (९४.२०) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा सिमा तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर,खजिनदार वैभव नाईक, संस्था समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, प्रशासकिय अधिकारी मकरंद तोरसकर, सह सचिव समन्वय समिती नंदकुमार नाईक, सर्व कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापिका एम. एम. सावंत यांनी अभिनंदन केले आहे.