
वैभववाडी : शिमगोत्सवानिमित्त कुसूर येथील होळीचा मांड येथे आज (ता.१९) रात्रौ ठिक १०वा. खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सौ सुविधा रावराणे, समाधान प्रतिष्ठान यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केला आहे.
या कार्यक्रमातील विजेत्या वहीनीला पैठणी व ३३३३ रोख रक्कम,उपविजेत्यला २५५५, तृतीय क्रमांक २०२०रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. गावातील महीलांनी मोठं संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.