
दोडामार्ग : कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आयोजित दोडामार्ग - कोलझरमध्ये 'खेळ पैठणी'चा रंगला. चुरशीच्या झालेल्या लढतीत संजना संजय देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया राजेश देसाई यांनी दुसरा क्रमांक तर तिसरा क्रमांक गौतमी संदीप देसाई यांनी मिळवला.
धमाकेदार खेळ, उखाणे, गाणी यांमुळे चांगलीच रंगत आली. महिलांनी धमाल करत खेळाचा आनंद लुटला. प्रथम क्रमांक विजेत्या संजना संजय देसाई यांना बेलवलकर ज्वेलर्स पुरस्कृत सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आलं. दुसरा क्रमांक विजेत्या प्रिया राजेश देसाई यांना अरविंद साडी सेंटर पुरस्कृत पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं. तिसरा क्रमांक मिळविलेल्या गौतमी संदीप देसाई यांना कृपा हेअर टॉनिक आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलंय. यावेळी कोकणसाद LIVE च्या संपादक देवयानी वरसकर, मार्केटिंग हेड समीर सावंत, श्री देवी माऊली देब्स्थान कमिटी आणि नवरात्रोत्सव समितीचे पदाधिकारी साई कृपा दिव्यांग निराधार, गरजू संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ टीम कोकणसाद LIVE ची टीम उपस्थित होती.
बाळू वालावलकर यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने देखील धमाल उडवून दिली. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या खेळ पैठणीला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.