
कणकवली : कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कल्प कॉर्नर येथे बाजारपेठची आई भवानी देवीच्या मंडपात रविवार २२ ऑक्टोबरला सायं. 6 वा. खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेकरिता प्रथम व द्वितीय पारितोषिक पैठणी, तृतीय पारितोषिक भेटवस्तू ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी सर्वेश शिरसाट (9960502102) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.