अमृता वेंगुर्लेकर 'खेळ पैठणी'च्या मानकरी !

मोहिनी मडगावकर यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 13:18 PM
views 85  views

सावंतवाडी : अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी सावंतवाडीतील भोसले उद्यानामध्ये भाजपा अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने महिला मोर्चा सावंतवाडी शहर मंडळ कडून राम लल्लाचे पूजन करून सर्वांना जिलेबी वाटप करण्यात आले.

तसेच संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला होता. यानंतर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पण घेण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांनी आणि सावंतवाडीकर यांनी दिला. या खेळामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी अमृता वेंगुर्लेकर यांना मिळाले. द्वितीय क्रमांकाची साडी प्राजक्ता बांदेकर ,तृतीय क्रमांकाची साडी संचिता केनवडेकर यांना मिळाली.

तसेच सामाजिक कार्यातील महिला ,उद्योजिका ,शिक्षण क्षेत्रातील महिला यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर प्रणाली गोलगाटे , रेडीज ,सरिता फडणीस ,रेखा कुमठेकर ,शारदा गुरव ,मेघना राऊळ ,माजी सरपंच सुप्रिया मडगावकर ,दळवी ,मनीषा नवांगुळ ,कल्पना बांदेकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच हरे कृष्णा संघटनेकडून आरती करण्यात आली आणि फुगड्या घालण्यात आल्या. शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करून राम लल्लाच्या येण्याचा जल्लोष करण्यात आला.

या कार्यक्रमाला राजन तेली, संजू परब  ,अनिल निरवडेकर ,केतन आजगावकर ,दिलीप भालेकर ,सुधीर आरिवडेकर ,उदय नाईक,रवी मडगावकर ,बंटी पुरोहित ,अमित परब ,अजय सावंत यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच सावंतवाडी महिला मोर्चा यांच्या सहकार्यानं रामलल्लाचं स्वागत करण्यात आलं .