स्वप्नाबाबत योगेश आर्याचा पोलिसांसमोर मोठा खुलासा

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 09:25 AM
views 2264  views

चिपळूण : खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ वाढतच चालले आहे. सिंधुदुर्गातील रहिवाशी असलेल्या योगेश आर्या याने खेड पोलीस ठाण्यात स्वतः येऊन या मृतदेहासंबंधी,  आपल्याला स्वप्न पडून, एक अनोळखी व्यक्ती मदत मागत आहे. मला झोप लागत नाही. मृतदेह दिसतो, आपण माझ्याबरोबर घटना स्थळावर चला, असे सांगितल्यानंतर खेड पोलिसांना हा मृतदेह आढळून आला. 

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील, आजूबाजूलाचा परिसर जंगलमय असला तरी, हा भाग खेड,  भोस्ते गाव, वेरळ आणि खेड रेल्वे स्टेशनच्या जवळचा आहे. महामार्गावरून सतत वाहतूक सुरु असते. वाहतूूक पोलीस नियमित या मागावर कारवाईसाठी फिरत असतात. मात्र या सडलेल्या मृतदेहाचा शिल्लक असलेला सांगाडा आणि येणारी दुर्गंधी वरून हा मृत्यू तीन महिन्यांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे. हा मृतदेह कोणाचा, झाडाला टांगलेला फास आणि घटनास्थळी सापडलेल्या वस्तू आणि डोक्याची कवटी यामुळे, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलेले आहे.

दरम्यान मृतदेह मिरज येथील प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील जानेवारी २४ पासून, बेपत्ता झालेल्या १८ जणांची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच गोवा आणि सिंधुदुर्गातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत.

योगेश आर्या कोण ? 

योगेश आर्या ( वय ३० वर्षे)  मूळचा बिहारी, मात्र सध्या सिंधुदुर्गातील सावंतवाडीत राहतो. योगेश उच्चशिक्षित असून त्याने गोवा आणि सावंतवाडीत वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या आहेत. तो एवढ्या लांब जंगलात कशाला गेला. एवढे दिवस खेड तालुक्यात काय करित होता. या विषयी जाणून घेताना . पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  योगेश आर्या चे वागणे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यासारखे आहे. तो सावंतवाडीतून एका कंटेनरमध्ये बसून आला होता. तो मानसिक स्वास्थ्य बिघडल्यासारखा १० सप्टेंबर पासून खेड परिसरात फिरत होता. याकाळात तो बस स्थानक,  रेल्वे स्टेशन,  महामार्ग,  वेरळ , भोस्ते घाट आणि घाटातील जंगलात फिरला आहे. जंगलात फिरताना त्याला हा मृतदेह दिसला आणि तो घाबरण्याचे त्याला झोप लागत नव्हती. मृतदेह डोळ्यासमोर दिसायचा म्हणून त्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले.  


योगेश आर्याचा मोठा खुलासा !

शेवटी खेेड पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. घाबरल्यामुुळे स्वप्न पडत असल्याची मनातील कथा रचून सांगितली, असल्याचे जबाबात म्हटले आहे. योगेश आर्या चौकशी साठी खेड पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्याने पोलिसांना माहिती देऊन , सावंतवाडीला निघुन गेला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली नाही.

 रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काल  २० सप्टेंबरला घटना स्थळाची पाहणी करून,  या प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घातल्यावर तपासाला वेग आला आहे.