कोकणातील 'खातूं'च्या विश्वासार्ह उत्पादनांची उत्तुंग भरारी

Edited by: मनोज पवार
Published on: September 08, 2024 13:06 PM
views 714  views

चिपळूण : खाद्य संस्कृतीत उत्कृष्ठ चविसाठी मसाले म्हटले की, घरगुती आणि पारंपरिक पध्दतीने केलेल्या मसाल्यांचा अजूनही प्राधान्य दिले जाते. सध्या बाजारात अनेक मसाल्याचे ब्रॅण्ड उपलब्ध असले तरी,  कोकणात जर मसाले उद्योगात अव्वल आणि दर्जेदार, कोण असं विचाराल तर मात्र ते पहिलं नाव घेतल पाहिजे ते, कोकणातील गुहागरच्या सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाच. गेली ४८ वर्षे मसाले उद्योगात कार्यरत असलेल्या या  आज कोकणातीलच नव्हे तर अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर  आणि ऑनलाईन च्या माध्यमातून स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलंय. घरगुती पद्धतीने प्रक्रिया करून , मात्र आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर आणि आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात आणलेले मसाले वापरून चविष्ट आणि उत्कृष्ट खाद्य पदार्थ बनवायचे असतील तर, खातू मसाले हाच ब्रँड उत्तम पर्याय असल्याचे ,अनेक वर्षांपासून वापर करणारे असंख्य ग्राहक सांगतात. 


घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान आणि चवदार खाद्यपदार्थ आणि आपली डिश स्वादिष्ट बनविण्यासाठी  खातू मसाले आहेतच,  आता या मसाल्यांसोबत,  खास गणपती च्या सणानिमित्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक झटपट बनविण्याचे , बासमती तांदुळाचे  उकडीेेचे मोदक पीठ बाजारात आणले आहे.  खास कोकणी घरगुती मोदक पीठ बनविण्याच्या पध्दतीने  हे मोदक पीठ बनविलेले असल्याने , मोदक, बासमतीचा सुगंध येत उत्तम प्रतीचे बनतात. 

कोकणातील गौरी गणपती, दसरा , शिमगा अशा विविध सणाच्या काळात वडे मटण , कोंबडी वडे म्हणजे , मेजवानीच. हे वड्याचे पीठ सुद्धा कोकणी पद्धतीने  तांदूळ,  ज्वारी , चणाडाळ,  उडीदडाळ, धणे , बडीशेप आदी गरम मसाल्याचे पदार्थ वापरुन बनवले जाते.

 अशा खास कोकणी पद्धतीने बनविलेले खातू मसालेंचे वडे पीठ म्हणजे महिलांसाठी पर्वणीच आहे. या पिठापासून,  उत्तम टमटमीत फुगलेले वडे  ही आज कोकणातील मांसाहारी मेजवानीतील, अविभाज्य घटक झालेली आहे.


  खातू मसाले उद्योगाची मुहूर्तमेढ, शाळिग्राम खातू यांनी ४८ वर्षांपूर्वी, गुहागरातून एका छोट्या जागेत रोवली. प्रचंड मेहनत आणि खडतर प्रवास करत,  कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी हा उद्योग नावारूपास आणला आहे. आज पत्नी , दोन मुलगे, विश्वासू कर्मचारी आणि वर्षानुवर्षे खातू मसाल्यांचा विश्वास ठेवणारे ग्राहक यामुळेच हा पल्ला आपण गाठू शकलो, असल्याचे उद्योजक शाळिग्राम खातू सांगतात. 

 गेली ४८ वर्षे, ग्राहकांना  घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान देत  असलेला खातू उद्योग समूह ठामपणे सांगतो की, ज्यांनी  खातू मसाले  आणि पीठ वापरले ते सांगतीलच पण आपणही , खातू मसाले आणि पीठ वापरल्यावर इतरांना सांगाल. मसाले आणि पीठ बनविण्यासाठीचा नेहमीच ,उत्तम प्रतीचा कच्चा माल वापरणे,  मिरची, धान्य आणि इतर साहित्य उत्तम प्रतीचे वापरायचे . मसाले अथवा पीठ सर्वच उत्पादनांच्या (क्वालिटी ) दर्जामध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही , ही खातू मसाले उद्योगाच्या यशाचे मुख्य सूत्र आहे.

१९७५ पासून मसाले उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खातू उद्योग समूहाने, पारंपरिक पद्धती न सोडता , आधुनिक मशिनरी वापरून आणि आकर्षक पॅकिंगमध्ये  बाजारपेठेत आणलेल्या आपल्या सर्व उत्पादनांची   कोकणवासियांच्या आणि असंख्य ग्राहकांच्या मनात आणि हृदयात एक विश्वासच नातं निर्माण केलंय. सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थ आणि डिश साठी खातू उद्योग समूहाने मसाले आणि पीठांच्या व्हरायटी तयार केल्या आहेत. 


यात प्रामुख्याने गरम मसाला, भाजका मसाला, गोडा मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला, कुर्मा मसाला, भाजका मिक्स मसाला, बॅडगी मिरची पावडर, लसूण चटणी, हळद, लोणचे मसाला, पावभाजी मसाला अशी मसाल्याची प्रत्येक व्हरायटी खातू मसाले उद्योगाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.  तसेच  डांगर पीठ,  मोदक पीठ,  वडे पीठ,  उपवास थालीपीठ भाजणी, थालीपीठ भाजणी, नाचणी सत्व, मेतकूट, चकली भाजणी, कुळीथ पीठ आदी सर्वच पीठ उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने,  आज खातू मसाले हे नाव बाजारपेठेतील प्रमुख ब्रँड ठरले आहे.खातु उद्योगाचे जनक शाळिग्राम खातू आणि खातू उद्योगाने महाराष्ट्र आणि कोकणात राबविलेल्या अनेक प्रभावी मार्केटिंग कल्पनांमुळे खातु मसाले हे नाव घराघरात पोहोचले आहे. 

आज कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश विदेशात सुद्धा आपला बोलबाला आणि चव पोहचवण्यासाठी खातू मसाले उद्योग सज्ज झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह, देशातील अनेक देशांत आणि अमेझॉन, फिल्पकार्ड, जिओ मार्ट यासारख्या प्रमुख ऑनलाईन बिजनेस प्लॅटफॉर्मवरही  खातू मसालेची ग्राहकांसाठी सर्व उत्पादने उपलब्ध आहेत. चला तर मग वाट कसली पाहाताय. एकदा वापराल तर रोजच वापराल कोकणच्या खातू मसाले उद्योगाची उत्पादने.