
कणकवली : आमदार नितेश राणेंनी सेनेला अजून एक धक्का दिला. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेतील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू लागले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून हे प्रवेश होत आहेत. सोमवारीदेखील एक पक्ष प्रवेश झाला.
यावेळी खारेपाटण अपक्ष सरपंच रमाकांत राऊत, विजय सावंत, प्रकाश आडविलकर, राकेश राऊत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आम. नितेश राणेंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील विकास कामांसाठी आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली.