
वेंगुर्ला : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "खेलो इंडिया" अभियानातून खेड्यापाड्यातील क्रिडा गुणांना वाव मिळवून दिला आहे. यामधून गावपातळीवरील खेळाडू चमकत देशाचे नाव रोशन करण्यासाठी पुढे येत आहेत. हीच थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे देखील खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील युवा खेळाडूंना क्रीडांगणापासून ते कोचपर्यंत सर्व सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाव्यात, यासाठी सर्व क्रिडातज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्याचे नियोजन करण्यात येत आहे.
यावेळी आज बुधवारी विशाल परब यांच्या सहकार्यातून वेंगुर्ले येथील खर्डेकर महाविद्यालयातील तालुका, जिल्हा तसेच विभागस्तरावर विविध खेळातून आपली चमक दाखवून दिलेल्या युवा खेळाडूंना स्पोर्ट्स किट देण्यात आले. खर्डेकर महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले. गुणवंत खेळाडूंना यापुढेही आमचे नेतृत्व युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच प्रोत्साहित करण्यात येईल असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर काल झालेल्या जिल्हास्तरीय १९ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत गोपाळ परमानंद नार्वेकर यांने प्रथम क्रमांक प्राप्त करत विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. बी. चौगुले, परबवाडा उपसरपंच पपू परब, भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, सायमन अल्मेडा, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, पर्यवेक्षक डी.जी. शितोळे, व्ही.पी. देसाई, वासुदेव गावडे, हेमंत गावडे, जे वाय नाईक, विवेक चव्हाण, वामन गावडे आदी मान्यवर कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.