खांबाळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी मंगेश गुरव बिनविरोध

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 11, 2024 13:57 PM
views 148  views

वैभववाडी : खांबाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगेश गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे.गेल्या काही दिवसांपासुन हे पद रिक्त असलेल्या या पदासाठी आज (ता.११) निवडणूक झाली.यावेळी श्री.गुरव यांची बिनविरोध निवड झाली. खांबाळे गावचे उपसरपंच गणेश पवार यांनी पक्षातर्गंत समझोत्यानुसार अडीच वर्षानतंर राजीनामा दिला होता.त्यानतंर हे पद गेले काही महिने रिक्त होते.दरम्यान आज पदाकरीता निवडणुक कार्यक्रम राबविण्यात आला.उपसरपंच पदाकरीता मंगेश पांडुरंग गुरव यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवड जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.श्री.गुरव यांचे गावातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सर्वानी प्रत्यक्ष भेट देवुन अभिनंदन केले.यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके,सरपंच प्राजक्ता कदम,ग्रामसेवक सौ.नयना गुरखे,तटांमुक्त समिती अध्यक्ष लवू पवार,पोलीस पाटील राखी पवार,प्रवीण गायकवाड,दिपक चव्हाण,गणेश पवार,कॅप्टन राजाराम वळंजु,नारायण पवार,रूपेश कांबळे,माजी सरपंच गौरी पवार,ग्रामपंचायत सदस्य नंदा मोरे,सौ.पवार,प्रमोद लोके,सुनील पवार,दिनेश पालकर,महादेव पवार,सदानंद गुरव आदी उपस्थित होते.

या निवडीनंतर बोलताना श्री गुरव म्हणाले,सरपंच आणि गावातील जेष्ठ आणि अनुभवी सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वागीण विकासासाठी काम केले जाईल.गावाने दिलेल्या या संधीचा गावच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करेन.ग्रामपंचायत पातळीवरून ज्या ज्या योजना ग्रामस्थांना देता येतील त्याकरीता प्रामाणिक प्रयत्न करेन असं आश्वासन श्री गुरव यांनी उपस्थितांना दिले.