खडखडे लाडु, खाजा, कुरकुरीत कांदा भजी, सोल कढी आणि मालवणी मनोरंजन

पुण्यात मालवणी भाषा दिवस उत्साहात साजरा
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 10, 2023 11:34 AM
views 180  views

पुणे : मालवणी नटसम्राट, स्व. मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव, डांगे चौक, येथील सिंधुदुर्ग भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि नाट्यसिंधु पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "मालवणी भाषा दिन" साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मच्छिंद्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. सुरुवातीला मालवणी पद्धतीने संजय सावंत यांनी गाऱ्हाणे घातले. सिटी प्राइड  स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अश्विनीताई जांभेकर-कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी अश्विनीताई म्हणाल्या, "मी आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला माझ्या माहेरी आल्यासारखे वाटते.  माझ्या वडिलांनाही आपल्या गाव कोकणची खूप ओढ होती.  शिक्षण क्षेत्रामध्ये वडिलांसोबत काम करत आले.  आज सिटी प्राइड ग्रुप ऑफ स्कूलच्या माध्यमातून कोकणवासियांची संस्था या शहरांमध्ये कार्यरत आहे, यापुढेही मला आपणा सर्वांसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय मदत लागली तर योग्य ते सहकार्य करण्याचा आश्वासन दिले. 


मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी प्रस्ताविक केले. मालवणी भाषा साता समुद्रापलिकडे कोकणातील बाबूजी नटसम्राट स्व. मच्छिंद्र कांबळी यांनी नेली आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त आपणही आपल्या माय मराठी बोली भाषेसोबत मालवणी ही तेवढ्याच आदराने बोलत जाऊ जेणेकरून पुढील पिढीला ही भाषा अवगत राहील. 


यावेळी एडवोकेट हरीश नढे पाटील, सेक्रेटरी एडवोकेट चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण दळवी, खजिनदार धर्मराज सावंत, सह खजिनदार चंद्रकांत साळसकर, सह सेक्रेटरी प्रकाश साईल, कार्याध्यक्ष विश्वास राणे, नाट्य सिंधूचे अध्यक्ष राजेश कांडर, महिला सिंधूच्या सौ,विद्या मेस्त्री, भजन सिंधूचे अध्यक्ष विठ्ठल परब, पांडुरंग देसाई हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित सर्व मंडळी मालवणी भाषेमध्ये आपापल्याशी संवाद साधत होते.  काही कलाकारांनी मालवणी भाषेमध्ये आपले संवाद साधत कला सादर केली, यामध्ये प्रामुख्याने पांडुरंग देसाई, सौ. प्रणिता देसाई, रामचंद्र तावडे, यशवंत गावडे संतोष परब, सुनील गायकवाड, बाळकृष्ण नाईक, सौ. स्वाती गावडे, सौ. शीतल परब, सौ. सोनाली कांडर यांच्यासह कु. वसंत मुळीक, ओमकार गावडे या बालकलाकारांनी आपली कला सादर करुन मनोरंजन केले.


सदर कार्यक्रमासाठी सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन प्रतिसाद दिला. मनोरंजनाबरोबरच खडखडे लाडु, शेंगदाना लाडु, खाजा, आरंभ होटेलच्या मनाली पाताडे यांनी बनविलेली सुमधूर सोलकडी, विश्वास राणे यांनी आणलेली खमंग कुरकुरीत कांदाभजी या मालवणी मेव्यावर गाववाल्यांनी यथेच्छ ताव मारला.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पराग पालकर, आनंद साटलकर, संतोष गावडे, बाळा गुरव, संजय सावंत,अनिल सावंत यांचे विषेश सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संतोष गावडे यांनी मानले.