खा.राऊत,आ. नाईक यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात विकासकामांचा धडाका

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 29, 2023 19:57 PM
views 108  views

कुडाळ : खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये आंजिवडे, पुळास, वसोली, साकिर्डे या गावात BSNL टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२०-२१ अंतर्गत पुळास  निकमटेंब रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १५ लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांची भूमिपूजने आज खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी सभापती श्रेया परब,रमाकांत ताम्हाणेकर,सुधीर राऊळ, राजू गवंडे,छोटू पारकर,वसोली सरपंच अजित परब,उपसरपंच सदानंद गवस, विभागप्रमुख रामा धुरी, विभागप्रमुख  बंड्या कुडतरकर, कौशल जोशी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, पुळास सरपंच विनया निकम,बाबी निकम,शामा सकपाळ, मधू सकपाळ,कृष्णा पंधारे,पिंट्या उभारे,पोलीस पाटील पंधारे,मदन रेगूळकर,जिजानंद शेडगे,सदानंद गवस,श्री. परब, प्रियांका परब,सौ. बांदेकर,अमित राणे,तुषार परब,स्वप्नील शिंदे,उमेश कविटकर,उत्तम कविटकर,तात्या निकम,बाबू निकम,प्रभाकर सावंत,यशवंत कदम, भाऊ सावंत,दिगंबर तवटे, महादेव राऊळ,दीक्षा तवटे,सचिन भिसे, अवधूत गायचोर,श्रीनिवास कारुडकर,विनिता सावंत आदी उपस्थित होते.