काँग्रेसच्या केतनकुमार गावडेंनी उपकार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट..!

Edited by:
Published on: January 15, 2024 07:02 AM
views 61  views

सिंधुदुर्ग : काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांनी प्रलंबित रस्ते व अपूर्ण पुलाच्या संदर्भात उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.

या भेटीत तळवडे ते वेंगुर्ला मुख्य रस्त्याची मळगाव ते तळवडे पर्यंत डागडुजी करणे. तळवडे बाजारपेठ ते खेरवाडी मार्गे नेमळेला जोडणाऱ्या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने चालू करणे. पेंडूर गावातील गिरोबा मंदिर येथील पुलासाठी मंजुरीला टाकलेल्या कामाबाबत चौकशी व लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी चर्चा केली.

वरील सर्व कामे अतिमहत्त्वाची आहेत. यात कुठलाही राजकीय हेतू नसून ही सर्व कामे त्वरित व्हावी यासाठी उपकार्यकरी अभियंता यांच्याशी चर्चा केली.