केसरकरांचे सुप्रिया सुळेंना खुलं आव्हान...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 28, 2023 12:14 PM
views 842  views

सावंतवाडी : राज्यात शाळा बंद बार सुरू अशी टिका करणाऱ्यांनी एक जरी शाळा बंद केली असे पुराव्यासहित सिद्ध करा मी पदावर एक क्षण ही थांबणार नाही असे आव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर दिले आहे. घरची संपत्ती विकून राजकारण करतो हे खोक्याचा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. अन्यथा मी तोंड उघडले तर काय होईल लक्षात ठेवा असा इशारा ही मंत्री केसरकर यांनी दिला आहे.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विविध कार्यक्रमा च्या निमित्ताने शुक्रवारी सावंतवाडीत आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले,मला शिक्षण विभागाचे बरेच काम आहे. त्यामुळे मी खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे याच्यावर टीका करत नाही.पण खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर केलेली टिका निरर्थक आहे.मतदार संघातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.पण जनता सुज्ञ आहे असं ते म्हणाले.