
सावंतवाडी : माझ्या विजयाच श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना जात. निलेश राणे, नितेश राणे, माझे कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत व सौभाग्यवती निलम राणेंच्या मेहनतीचं माझा विजय फळ आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मंत्री उदय सामंत यांनी माझ्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. दीपक केसरकर एक नंबरला आहेत. या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दिली. कोकणातून मिळालेल्या विजयानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले.