
सावंतवाडी : गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात अडीज हजार कोटीहून अधिक निधी मतदारसंघात आणला, व्हिजन असलेले नेते म्हणून केसरकरांकडे पाहिले जाते, तसेच शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्याबद्दल तीनही मतदारसंघात मतदारांना विश्वास आहे, शिक्षणमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले , शिक्षक भरती केली, शिक्षण सेवक तसेच अंगणवाडी सेविका यांचे वेतनवाढ केली, केसरकर यांनी त्यांच्या कामाने जनतेच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे.
त्यामुळे केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडीच्या महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब यांनी व्यक्त केला.