गृहमंत्री फडणवीसांच्या गणरायाचं केसरकरांनी घेतलं दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2024 09:55 AM
views 183  views

सावंतवाडी : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासमोरील विघ्ने दूर कर, जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.