
सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली- गेळे- चौकुळ कबुलायतदार प्रश्न मंत्री दीपक केसरकर सोडवू शकले नाहीत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरात हा प्रश्न सोडून दाखवला. त्यामुळे केसरकर समर्थकांनी उगाच फुक्याचे श्रेय घेऊ नये असा टोला युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी लगावला.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानेच हा प्रश्न सुटला, त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व राजन तेली यांचे आभार त्यांनी मानले आहेत.