
सावंतवाडी : विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सावंतवाडीचे सुपुत्र अँड राहुल नार्वेकर यांची माजी शालेय शिक्षणमंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संयमी स्वभावाच्या नार्वेकर यांनी मागील विधानसभेतही अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले होते. याही विधानसभेत ते चांगल्या पद्धतीने काम करतील, अशी मला खात्री आहे असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी हंगामी अध्यक्ष आ. कालिदास कोळंबकर उपस्थित होते.