राणे - सामंत वादात केसरकर वर्णी लावू पहातायत : प्रवीण भोसले

राजन तेलींनी आता स्वप पाहू नये !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2024 08:20 AM
views 403  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. समोरच्यांचा उमेदवार देखील अजून निश्चित होत नाही आहे‌. त्यामुळे दोन लाखांच्या मताधिक्यानं ते तिसऱ्यांदा निवडून येतील असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. विनायक राऊत म्हणजे उद्धव ठाकरे अशी ही निवडणूक आहे‌. इंडिया आघाडीचा खासदार या ठिकाणी निवडून येईल. दुसरीकडे नारायण राणे व कीरण सामंत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यांच्या वादात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आपली वर्णी लागेल का हे पहात आहेत. तसा प्रयत्न ते करत आहेत. सामंत- राणेंमध्ये जेवढ पेटवता येईल तेवढं ते पेटवत आहेत. शिवसेना भैय्या सामंत यांच नाव घेत असताना केसरकर राणेंच नाव घेत आहेत. केसरकरांचा हा डुप्लिकेटपणा आहे. राजन तेलींच्या तो लक्षात येत नाही आहे. त्यामुळे राजन तेली यांनी आता स्वप पहाणे थांबवाव असा टोला प्रवीण भोसले यांनी हाणला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अँड. राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत कासार, सावली पाटकर, अँड. कौस्तुभ गावडे, शैलेश गवंडळकर, अशोक परब आदी उपस्थित होते.