
सावंतवाडी : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची मुंबई येथे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्प येथे होवु घातलेल्या प्रस्तावित अॅमुझमेंट पार्क प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागुन कार्यान्वित होण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी लवकरच तिलारी येथील अॅमुझमेंट पार्क प्रकल्प क्षेत्राल भेट देणार असल्याचे सांगितले असून सांवतवाडी तालुक्यातील मौजे शिरशिंगे जिल्हा सिंधुदुर्ग या मंजुर धरण प्रकल्पाबाबात उदृभवणा-या विविध समस्यांबाबत तोडगा काढुन हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आल्यची माहिती दिली. या प्रकल्पाबाबत लवकरच मंत्रालयात जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे श्री. महाजन यांनी आश्वासित केले.