
सावंतवाडी : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठीची चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देणे, नव्या पर्यटन सुविधा निर्माण करणे तसेच जिल्ह्यातील विविध पर्यटनविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित होते.










