
सावंतवाडी : केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र व गोवा सीमेवरील श्री देव काजरोबा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कवठणी येथे असलेला श्री देव काजरोबा चरणी मोठ्या संख्येने भाविक नतमस्तक झाले.
मोठ्या उत्साहात हा उत्सव पार पडला. सिंधुदुर्गवासियांसह गोव्यातील हजारो भाविक देवाचं दर्शन घेण्यसाठी आले होते. या गावातील अनेक भाविक कामानिमित्त मुंबई, पुणे येथे वास्तव्यास आहेत. जत्रोत्सवास ही सर्व मंडळी गावच्या जत्रेला आवर्जून आली होती. यानिमित्ताने श्री देव काजरोबाचरणी भाविक नतमस्तक झाले. कवठणी येथील केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे.