
दोडामार्ग : महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी, समग्र परिवर्तानासाठी लढे लढले. आज त्यांच्या विचार लढ्यांना आव्हान देणारी व्यवस्था एकाबाजूने पुढे येत असताना, महिला व पुरुषांंनी विशेषतः वैचारिक क्षेत्रातील अनुयायांनी परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत करायला हवी. कोणत्याही परिस्थितीत वैचारिक क्रांतीचा इतिहास विझू न देता तो तेवत ठेवायला हवा, असे विचार स्री चळवळीच्या अभ्यासिका -प्रा. पूनम गायकवाड यांनी व्यक्त केले.
दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये आर.पी.आय.(आठवले), सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ ( मुंबई ), जयभिम युवा मंडळ रमाई नगर झरेबांबर आणि आर.पी.आय.(आठवले)महिला आघाडी दोडामार्ग तालुका व पंचशील स्पोर्ट क्लब, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. पूनम गायकवाड बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.आय.(आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव- रमाकांत जाधव हे उपस्थित होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आर.पी.आय.(आठवले) महिला आघाडी तालूकाध्यक्षा- सौ.सरिता पिळगांवकर यांनी भूषविले.
प्रा. पूनम गायकवाड पुढे म्हणाल्या. भारतीय संविधान अभ्याससायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क अधिकार दिले त्याची जाणीव संविधानाच्या अभ्यासाशिवाय आपल्याला होणार नाही, हे प्रत्येकानी ध्यानात घेतले पाहिजे. आंबेडकर हे जैविक बुध्दिजीवी होते. आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करताना तितकाच व्यासंग जपून परिवर्तनाची चळवळ पूढे नेली पाहिजे. महिलांचे जगणे बदलले त्याचे श्रेय फुले आंबेडकरांना जाते. त्यामुळे महिलांनी फुले आंबेडकरांचे विचार कृतीत उतरवणे गरजेचे आहे. आज संविधानामुळे महिलांना विविध स्तरावर हक्क अधिकार प्राप्त झालेत. जयंतीच्या निमित्ताने केवळ बाबासाहेबांचा जयघोष करत बसण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक क्रांतीचा लढा नव्या पिढ्यांनाही समजून सांगितला पाहिजे, असे प्रा. पूनम गायकवाड यांनी स्पष्ट केले.
यावेळी सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबईचे केंद्रीय अध्यक्ष -व्ही.ए.कदम, आर.पी.आय.(आठवले)जिल्हा सरचिटणीस -प्रकाश कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई तालूका सचिव तथा झरे-2 चे उपसरपंच-अर्जुन आयनोडकर,आर.पी.आय.(आठवले) जिल्हा कार्याध्यक्ष-सखाराम कदम, जिल्हा उपाध्यक्ष-चंद्रकांत जाधव, आर.पी.आय.(आठवले)महिला आघाडी जिल्हा़ध्यक्षा तथा दोडामार्ग नगर पंचायत च्या नगर सेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर, महिला आघाडी जिल्हा सहसचिव-सौ.प्रगती प्रकाश कांबळे,पत्रकार-शंकर जाधव,आर.पी.आय.(आठवले) तालूकाध्यक्ष- रामदास कांबळे, तालूका सचिव-नवसो पावसकर,तालूका उपाध्यक्ष-मनोहर जाधव, सत्यवान पालयेकर,तालूका सहसचिव-नकुळ कांबळे, महिला आघाडी तालूका सचिव-सौ.मनस्वी कांबळे, ॲड.सौ.सुनीता नाईक सामाजिक कार्यकर्ते-समीर अनंत ताटे,सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई तालुका सदस्या कु. लिना कृष्णा कदम होत्या तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन -जयभिम युवा मंडळ रमाई नगर झरेबांबरचे सचिव-संदिप आनंद जाधव यांनी तर प्रास्ताविक -आर.पी.आय.(आठवले)जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.