
सावंतवाडी : कवठणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार अजित कवठणकर व त्यांच्या दोन प्रभागातील पाच सदस्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभाग क्र.2 मधुन या पूर्वीच दोन सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत .
या निवडणुकीत माजी सभापती / नगरसेवक अँड. परिमल नाईक हे स्वतः लक्ष ठेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत व त्यांना ज्येष्ठ गावकरी मंडळी, स्थानिक पदाधिकारी व बहुतांश युवा कार्यकर्ते यांचं बहुमोल सहकार्य लाभत आहे.