कौस्तुभ गावकर - पारस वरेरकरची नवोदय विद्यालयासाठी निवड..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 04, 2024 11:03 AM
views 311  views

देवगड  : देवगड तालुक्यातील जि .प. केंद्र शाळा साळशी नं.१ च्या कौस्तुभ गावकर व पारस वरेरकर या दोन्ही  विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली आहे. या प्रशालेतून मागील वर्षीही ३ विद्यार्थ्याची नवोदयसाठी निवड झाली होती.यावर्षीही २  विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने या शाळेने यशाची पंरपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी सन २०२३-२४  या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत केंंद्र शाळा साळशी नं.१ या प्रशालेतून ३ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी कौस्तुभ गावकर व पारस वरेरकर या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर कदम,पदवीधर शिक्षक संतोष मराठे,उपशिक्षिका  हेमलता जाधव, वर्गशिक्षिका स्मिता कोदले, यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल सरपंच वैशाली सुतार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  संतोष साळसकर, शिक्षक वर्ग,पालक व ग्रामस्थ यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत