
कुडाळ : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली च्या विद्यार्थ्याने प्रा. कल्पेश कांबळे, प्रा. शशांक गावडे, प्रा. स्वप्नाली जाधव, प्राची मिशाळ, गिरीश तेडोंलकर व स्वप्नाली गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ आयोजित, विद्यार्थी विद्यापीठ भवन - चर्चगेट मुंबई येथे संपन्न झालेल्या ५६ व्या युवा मोहोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी कौस्तुभ धुरी याने नाट्यसंगीत प्रकारामध्ये क्रमांक पटकावला. या करीता स्टुडंट कोआँर्डीनेटर म्हणून श्रेयस चव्हाण, प्राजक्ता जामसंडेकर, मिशल रईस व . तन्वी पाडावे यांनी काम पाहीले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष. निलेशजी राणे, सचिव नितेशराणे, प्राचार्य डाँ. महेश साटम, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.