कस्तुरी भानशेचं चिपळूण हाफ मॅरेथॉनमध्ये सुयश

Edited by:
Published on: December 29, 2024 19:39 PM
views 165  views

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली तालुका दापोली या विद्यालयाने संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेच्या उद्घाटनाला रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत,चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम, चिपळूणच्या माजी सभापती सौ पूजाताई निकम, सह्याद्री निसर्ग मित्रचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणचे अध्यक्ष सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 या चिपळूण हाफ मॅरेथॉन मध्ये 14 ते 16 वर्ष वयोगटात विद्यालयाचे 10 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी  कु. कस्तुरी कमलाकर भानशे  हिने तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. पियुष मारुती शिगवण याने सातवा क्रमांक पटकावला. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी गुहागरचे आमदार  भास्कर जाधव, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, भाऊ काटदरे, सचिन कदम डीवायएसपी राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक  सुनिल गुढेकर,राम चव्हाण , शिवानी महाजन, शैलेश आंग्रेबयांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, विश्वस्त,सेक्रेटरी महेश महाडिक,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, शालेय कमिटीचे चेअरमन श्रीमती गीतांजली वेदपाठक,विद्यालयाचे मुख्याध्यापक  मंगेश कोकीळ, कमलाकर भानशे,शालेय समिती सदस्य,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.