प्रकाश नारकर स्मृती चषक किल्ले बनविणे स्पर्धेत कसाल युवा मंडळ प्रथम

Edited by:
Published on: November 28, 2023 18:43 PM
views 42  views

सिंधुदुर्गनगरी : दिवाळीनिमित्त कसाल येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित स्व.प्रकाश नारकर स्मृती किल्ले बनविणे स्पर्धेत कसाल युवा मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला तर वाझरेवाडी मित्र परिवाराने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

दिवाळी सणा निमित्त बाल मनावर आपल्या ऐतिहासिक संस्कारांचे प्रत्यारोपण व्हावे या उद्देशाने कसाल येथे श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्यावतीने इतिहास प्रेमी स्व प्रकाश नारकर स्मृती चषक किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्याच वर्षी घेण्यात आलेल्या या किल्ले बनविणे स्पर्धेत कसाल माधील १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला.पूर्ण पर्यावरण पूरक तसेच पूर्ण पणे हाती किल्ले बनविण्याच्या या स्पर्धेत कसाल युवा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बनविला होता.तर वजरे वाडी मित्र परिवाराने प्रतापगड किल्ला बनविला होता.याल द्वितीय क्रम मिळाला तसेच मुरुड जंजिरा किल्ला बनविलेल्या कु निधी गावडे हिने तिसरा तर ओम कदम मुरुड जंजिरा आणि अविनाश कदम प्रतापगड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेचेवपरिक्षण किल्ले प्रेमी संतोष बांदेकर यांनी केले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी करण्यात आले.यावेळी संतोष बांदेकर,अवधूत मालणकर,राजू नारकर,ओमकार नारकर,संजय पिळणकर,ह.भ.प.ऋचा पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास कांदळकर,नंदू आंबेरकर,बाबू वालावलकर यांच्यासह श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.यावेळ ह.भ.प. ऋचा पिळणकर हीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वासू मावळा या विषयावर सुश्राव्य कीर्तन संपन्न झालं.तिला जस्मित आणि पल्लवी या भावंडांनी हार्मोनियम व तबला साथ दिली. या स्पर्धेत कु. दुर्वांक महाडेश्वर,तेज बांदेकर,गौरेश बांदेकर,भौतिक सुर्वे अशा लहान मुलांनिही सहभाग घेतला होता.सहभागी सर्व स्पर्धकांना चषक प्रदान करण्यात आले.