
सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गावर कसाल नदी पूल या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महामार्गावर दरड कोसळली आहे. ही दरड अजूनही कोसळत आहे. या मार्गावरील दरड बाजूला करून हा रस्ता स्वच्छ करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी पुन्हा पुन्हा दरड कोसळत असल्याने रस्ता स्वच्छ करणे म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांसमोरील आव्हानच आहे. यामुळे कसाल येथे कसाल बालमवाडी ते कसाल नदी पूल यापर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आली आहे.