कारसेवक दाजी सावंत - निळकंठ राऊळ यांचा सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2024 11:06 AM
views 84  views

सावंतवाडी : अयोध्येमध्ये श्री प्रभू रामाचे मंदिर उभारणीसाठी सन 1992 ला सावंतवाडी तालुक्यातून सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त गावातून दोन कारसेवक सहभागी झाले होते. दाजी लाडू सावंत व निळकंठ राऊळ या दोन्ही कारसेवकांच्या या केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धव्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त व गावकऱ्यांच्यावतीने कलंबिस्त श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह व्यासपीठावर सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रकाश दाजी सावंत व माजी पंचायत समिती सदस्य रमेश दाजी सावंत व लक्ष्मण निळकंठ राऊळ गजानन लक्ष्मण राऊळ या चौघांचा गौरव करण्यात आला.

या गौरवाला उत्तर देताना गजानन राऊळ व रमेश सावंत म्हणाले, श्री प्रभू राम मंदिर उभारणीस गावातून आमचे वडील तीस वर्षांपूर्वी अयोध्येत गेले. आज ते मंदिर उभारणीचा सोहळा पाहण्यास नसले तरी त्यांचे स्मरण या दुग्ध संस्थेने केले. खरंच अशी सामाजिक भावना संस्थेने दाखवून आमच्या वडिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आम्ही कुटुंबीय खरंच भाग्यवान आहोत. अशा सामाजिक प्रेरणेतून काम करणाऱ्या संस्थाचालकांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहायला हवे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी कलंबिस्त गावचे देवस्थानचे प्रमुख मानकरी गावकार अनिल हरी सावंत व देव कार अनिल सावंत तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल सावंत उपसरपंच सुरेश पास्ते कॅप्टन अरुण सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन अँड. संतोष सावंत, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, माजी सैनिक प्रकाश सावंत, शिवसेना शाखाप्रमुख दिनेश सावंत, संचालक दत्ताराम कदम प्रकाश तावडे ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव दूध शेतकरी राजन घाडी पशुवैद्यकीय चिकित्सक स्वप्निल सावंत प्रकाश पवार लवू राऊळ शिवाजी राऊळ सौ.पास्ते जानू पास्ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबा पास्ते माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ज्ञान मंदिर वाचनालयाच्या संचालिका मिलन जंगम, कॅप्टन सुभाष सावंत उदय सावंत गणू सावंत चंदू राजगे पांडुरंग सावंत अशोक सावंत वसंत सावंत, रमाकांत नाईक अरुण सावंत आदी उपस्थित होते.