नारायण राणेंच्या हस्ते कारसेवकांचा सन्मान !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 22, 2024 10:55 AM
views 554  views

कुडाळ : वेताळ भांबर्डे येथील सर्वात जुन्या 105 वर्षे झालेल्या राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेताळ बांबर्डे गावासह तालुक्यातील संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थिती आरती करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कार सेवक व कार सेविका यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कार सेवक राजू राऊळ, जगदीश उगवेकर, अशोक अणावकर, मोहन उर्फ राजू सामंत, कार सेविका तृप्ती बांबर्डेकर-नाईक, श्रेया श्रीकांत उगवेकर, यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजू राऊळ, रणजीत देसाई, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, दीपलक्ष्मी पडते, प्रकाश मोरये स्थानिक ग्रामस्थ मंदिर प्रमुख विठ्ठल सामंत, जनार्दन सामंत, एकनाथ सामंत, प्रमोद सामंत, सत्यविज सामंत, सुनील सामंत, राजू सामंत, आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित राम भक्तांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होत आहे. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी जगातील व भारतातील सर्व नागरिक एकत्र आले आहेत. प्रभू रामचंद्र आपणा सर्वांना निरोगी व दीर्घायुष्य देऊन असे शुभेच्छा व्यक्त करतो असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते वेताळ भांबाडे येथील 105 वर्षे जुन्या मंदिरात आरती करण्यात आली. तर माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते या आरती सहभागी झाले होते. यावेळी मंदिरात सुरू असलेल्या राम नाम जपात माजी खासदार निलेश राणे रणजीत देसाई सहभागी झाले होते.



ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली बाईक रॅली


वेताळ भांबाडे ग्रामस्थांनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी बाई करायली काढली.

यात प्रभू रामचंद्र माता सीता व हनुमान यांचा देखावाही साकारण्यात आला होता. ही बाईक रॅली वेताळ भांबर्डे येथील राम मंदिरात येऊन समाप्त करण्यात आली