
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात 6 हंत्तीचे मोठे संकट असतानाच तालुक्याच्या घाट माथ्याच्या सीमेवर कर्नाटक मधून 12 हंत्तीचा कळप ठाण मांडून असल्याची माहिती समोर आलीय. यावेळी खरोखरच हत्तीचा कळप त्याठीकाणी आला की नाही याची पाहणी करण्यासाठी दोडामार्ग वनविभागाची टीम बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात कणकुंबी येथे दाखल झाली. कणकुंबी वनविभागाने 12 हंत्तीचा कळप जांबोटी पंचक्रोशीत असल्या बाबतचा दुजोरा दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग तालुक्यात हत्तीचे ग्रहण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तालुक्यात 6 वन्य हत्ती कडून इथल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सुरु आहे. असे असताना कर्नाटक मधून 12 हत्तीचा कळप दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर ठाण मांडून आहे. या हत्तीचा कळप जर सीमेवरून दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला तर वनवीभागाची डोके दुखी वाढणार असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोडामार्ग वनविभाग कणकुंबीमध्ये दाखल
दरम्यान 12 हत्तीचा कळप दोडामार्गच्या घाट माथ्यावरील सीमेवर आल्याची माहिती दोडामार्ग वनविभागाला समजताच तात्काळ बुधवारी वनवीभागाची टीम ड्रॉन कॅमेरा घेऊन दोडामार्ग पत्रकारां सोबत कर्नाटक येथील कणकुंबी येथे दुपारी रवाना झाली होती. सर्व प्रथम कणकुंबी, जांबोटी दशक्रोशीत स्थानिक ग्रामस्था बरोबर चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांकसून अधिकृत माहिती मिळाली नसल्याने सायंकाळी कणकुंबी वनविभागाची भेट घेतली व खरोखरचं 12 हत्तीचा कळप आला की नाही याची माहिती घेतली. यावेळी कणकुंबी वनविभागाने 12 हत्तीचा कळप जांबोटी पांचक्रोशी व सीमा भागात असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. यावेळी दोडामार्ग वनविभागने ड्रोन कॅमेरा द्वारे सीमा भागात पाहाणी केली मात्र दिवसाची वेळ असल्याने हत्तीचा शोध लागला नाही.
कर्नाटक जांबोटी पंचक्रोशीत 12 हत्ती
दरम्यान कर्नाटक कणकुंबी येथे दोडामार्ग वनविभागासोबत हत्तीची माहिती घेण्यासाठी गेलो असता. कणकुंबी येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. खरोखरच हत्तीचा कळप याठीकाणी आला होता काय? या संदर्भात विचारणा केली यावेळी जांभोटी पंचक्रोशीत रविवारी 12 हत्तीचा कळप आला असल्याची माहिती मिळाली. मात्र हे 12 हंत्ती दांडेली येथे जात असल्याची माहिती देण्यात आली. मात्र हा हत्तीचा कळप दांडेलीच्या दिशेने जात असताना विभक्त तर होणार नाही ना? विभक्त झाले तर त्यातील काही हत्ती दोडामार्ग मध्ये येण्याची ही शंका नाकारता येऊ शकत नाही.










