कारिवडेत विकासकामांचा धडाका !

Edited by: ब्युरो
Published on: February 04, 2024 11:55 AM
views 158  views

सावंतवाडी : कारिवडे गावामध्ये विविध तब्बल सात विकास कामांची भुमिपूजन करण्यात आली. भारतीय जनता‌ पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा बॅंक संचालक महेश ‌सारंग यांच्या हस्ते या विकासकामांची भुमिपुजन व उद्घाटन करण्यात आली.


यामध्ये कारिवडे ग्रामपंचायतपासुन ते गांवकर घर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.५लक्ष,कारिवडे भैरववाडी मुख्य रस्ता ते नारायण शिवा सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण रु.५लक्ष, कारिवडे गोसावीवाडी मार्ग ग्रा मा १९३ मजबुतीकरण करणे,रु.५लक्ष, श्री हनपाडे गवळीवाडी यांच्या घरापासुन ते कुपेरतर पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, कारिवडे गवळीवाडी ते हनपाडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण, कारिवडे गवळीवाडी मुख्य रस्ता गवळदेव मंदिर ते माडखोल गवळीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यात,रु.८.५ लक्ष व कारिवडे भैरववाडी ओटवणे इ.जि.मा.७८ मजबुतीकरण करणे.रु.२५  लक्ष आदी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी कारिवडे गावचे सरपंच सौ.आरती अशोक‌ माळकर,उपसरपंच नितिन गावडे,माजी‌ पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता केळुसकर, ग्रा.प.सदस्य महेश‌ गांवकर, ग्रा.प.सद्स्य तुकाराम बंटी आमुणेकर, ग्रा.प.सदस्य  भिकाजी कवठणकर, ग्रा.प.सदस्या सौ.भाग्यश्री भारमल, ग्रा.प.सदस्या सौ.साक्षी परब, ग्रा.प.सदस्या सौ.अरुणा सावंत,अशोक‌ माळकर, भाजपा आंबोली‌ मंडळ उपाध्यक्ष आनंद तळवणेकर, शक्ती प्रमुख, अमर धोंड युवा प्रमुख, तानाजी साईल, माजी सरपंच उमेश गांवकर, रविंद्र ठाकुर, व्हा.चेअरमन कारिवडे सोसायटी, सौनु सावंत, कारिवडे सोसायटी संचालक, लक्ष्मण भालेकर, भालचंद्र भारमल तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते.