कणकवलीत 'बेटी बचाओ बेटी पढाओ' जनजागृती कार्यक्रम

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 17, 2026 19:15 PM
views 11  views

कणकवली : कणकवलीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत दिनांक 12 मार्चला अभय केंद्र कणकवली या कार्यालयातर्फे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती येथून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मनीषा देसाई, बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहा सामंत, सर्व मुख्य सेविका व पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी, कणकवली पोलीस कर्मचारी, कणकवली तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच जिल्हा महिला व बालविकास सिंधुदुर्ग अधिनस्त अभय केंद्र कणकवली कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सदर रॅली ही 'बेटी बचाओ बेटी पढावो' या थीमवर आधारित असून पंचायत समिती कणकवली ते कणकवली बस स्थानक पुन्हा पंचायत समिती कणकवली येथे रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस  सभापती  हर्षदा वाळके मॅडम,मा उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.