भालचंद्र महाराज संस्थानतर्फे क्षयरुग्णांना धान्य किट वाटप

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 14, 2026 19:05 PM
views 15  views

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत नुकतेच गरजू व गरीब क्षयरुग्णांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा व त्यांच्या उपचारांना पूरक मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक लाभार्थ्यास तांदूळ, तेल, कडधान्य तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले धान्य किट देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू क्षयरुग्णांना उपचार काळात आवश्यक पोषण मिळण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र सिंधुदुर्ग  डॉ. दिपा देशपांडे,आरोग्य पर्यवेक्षक किशोर लाड,लीलाधर सोमजी, नितीन नाईक, जयदीप वावळीये, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे तसेच क्षयरोग पर्यवेक्षक संभाजी नांदगावकर, संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत,  निवृत्ती धडाम, दादा नार्वेकर, विश्वस्त मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे तसेच व्यवस्थापक विजय केळूसकर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.