अजित पवार यांची उद्या कणकवलीत शोकसभा

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 01, 2026 13:42 PM
views 32  views

कणकवली : राष्ट्रवादीचे नेते व  उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे कर्तबगार व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून कै. अजितदादा पवार ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अकस्मिक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे एवढे नुकसान झाले आहे. म्हणूनच अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत सर्वपक्षीयांनी व सामाजिक संस्था यानी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले आहे.