
कणकवली : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कणकवली शिवसेना शाखेत मानवनंदना अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी बाळासाहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, सचिन सावंत, नगरसेवक संकेत नाईक, तेजस राणे, धीरज मेस्त्री, राजू राणे, रुपेश आमडोस्कर, महेश कोदे, अरुण परब,अजित काणेकर, रवी भंडारे, लक्ष्मण हन्नीकोड, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.










