
कणकवली : शहरातील मतदारांना १५ हजार रु. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये ! ग्रामीण भागातील मतदार अशा आशयाचा होता तो बॅनर आता गायब झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आला होता. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे आणि याच दरम्यान कणकवली येथील हळवल फाटा येथील तो जागरूक नागरिकाचा बॅनरची गावागावात सुरू चर्चा सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा हा बॅनर त्या ठिकाणावरून गायब झाला झाला आहे.











