
कणकवली : शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. कणकवलीत ओम गणेश निवासस्थाने जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय आग्रे, संजू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.










