
दोडामार्ग : प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान रोखण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक कचरा जनजागृती व संकलन अभियान अंतर्गत दिनांक ५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आडाळी कोसमवाडी शाळा नं. २ येथे शाळा स्तरावर प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत निरुपयोगी तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमात अन्मेश अजित सावंत या विद्यार्थ्याने तब्बल २० किलो प्लास्टिक कचरा गोळा करून उल्लेखनीय योगदान दिले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली आहे.










