
बांदा : निगुडे गावाचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे हे भाजपाकडून इन्सुली पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढवण्यासा इच्छुक आहेत. समीर गावडे यांचा जनसंपर्क चांगला असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसहित कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळातही त्यांचं काम समाधानकारक राहीलं आहे. आपल्या अडीअडचणीला धावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. आपल्याला इन्सुली पंचायत समिती मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच विजय मिळवू असा विश्वास समीर गावडे यांनी व्यक्त केला.










